पाकला भिखेचे डोहाळे, इम्रान खान इतर सत्ताधाऱ्यांप्रमाणे पाकिस्तानातून पळ काढणार?

कर्जाचा आकडा 32 हजार अब्जांच्या पुढं पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर

नवी दिल्ली । पाकिस्तानचा आर्थिक विकास दर दिवसेंदिवस खालावला जात आहे. मध्यतंरी तिथं मोठ्या प्रमाणात महागाईही वाढली होती. यातून सावरण्यासाठी इम्रान यांनी हे हजारो अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं. पण आता त्या कर्जामुळं पाकिस्तान भिकेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं दिसतं आहे.

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती संपूर्ण जगाला माहिता आहे. पाकिस्तानची पहिल्यापासूनच दुर्दशा सुरु आहे. पण पाकची आता फारच बिकट अवस्था झाली आहे. इम्रान खान यांना पंतप्रधान पदाची सुत्रं हाती घेतल्यापासून तर पाकिस्तानची खूपच दुर्दशा झाल्याचं पहायला मिळतं आहे. इम्रान सरकारनं एका वर्षाच्य़ा कार्यकाळात विक्रमी कर्ज घेतल्याचं समोर आलं आहे. यामुऴं पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या संकटात सापडला आहे.

पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनूसार, इम्रान सरकारच्या एका वर्षाच्या कार्यकाळात देशातील कर्जाच्या रकमेत एकूण 7 हजार 509 अब्ज रुपयांची वाढ झाली आहे. पाकिस्तानने ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 दरम्यान परदेशातून 2 हजार 804 अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तर, देशांतर्गत खासगी स्त्रोतांकडून 4 हजार 705 अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं आहे. कर्जाचे हे आकडे पाकिस्तानी स्टेट बँकेनं पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहेत. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्ताननं अगोदरचं खूप मोठं कर्ज घेतलेलं आहे. या दोन्ही व्यतिरिक्त पाकला चीननेही भरपूर कर्ज दिलेलं आहे.

- 2019 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत कर्जात 1.43 टक्क्यांची वाढ

- कर्जात वाढ होऊन ते 32 हजार 240 अब्ज रुपयांवर

- ऑगस्ट 2018 मध्ये हे कर्ज 24 हजार 732 अब्ज रुपये होतं, तर 2018 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत कर संग्रह 960 अब्ज रुपये इतका होता.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था काही महिन्यांपुर्वी पुर्णपणं ढासळली होती. त्यांचा आर्थिक विकास दर दिवसेंदिवस खालावला जात आहे. मध्यतरी तिथं मोठ्या प्रमाणात महागाईही वाढली होती. त्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये इम्रान खान सरकारविरोधात रोष पहायला मिळाला. यातून सावरण्यासाठी इम्रान यांनी हे हजारो अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं. पण आता त्या कर्जामुळं पाकिस्तान भिकेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं दिसतं आहे. आता अशा परिस्थितीत इम्रान खान पाकिस्तानला कशा पद्धतीनं बाहेर काढणार, की इतर सत्ताधाऱ्यांप्रमाणे पाकिस्तानातून पळ काढणार हे लवकरचं पाहायला मिळेल.AM News Developed by Kalavati Technologies