राज्यात नविन समीकरणे जुळणार, संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता

मुंबई । राज्याच्या राजकारणात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी आले आहेत. कारणही तसेच आहे, काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले असून, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच संजय राऊत देखील शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्वर ओकवर येणार आहेत.

भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम असताना दोन्ही पक्ष एकत्र आल्याने आजही पाहायला मिळाले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही चुकीच्या लोकांसोबत गेल्याचे दुःख असल्याचे म्हटले आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही बोलले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा तिढा पवारांच्या मदतीने सुटणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.AM News Developed by Kalavati Technologies