राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

काही दिवसांपुर्वी राज्यपाल संमांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप शरद पवार यांनी केला होता.

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजभवनावर दाखल होत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज्यातल्या विविध विषयावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी राज्यपाल संमांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप शरद पवार यांनी केला होता.

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात शासकीय निर्णय घेण्यावरून काही दिवसांपासून वाद आहे. राज्यपालांनी शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले असल्याची चर्चा आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेटीचे निमंत्रण दिल्यानंतर शरद पवार राजभवनावर पोहोचले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल आणि शरद पवारांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीमध्ये काय चर्चा झाली याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.AM News Developed by Kalavati Technologies