शिवसेना प्रवेशाविषयी राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे म्हणतात की...

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या

जालना | सध्या राज्यातील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांची पळवापळवी सुरू आहे. राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि नेते सत्ताधारी भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आता त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी त्यांनी मौन सोडले आहे. माझ्या शिवसेना पक्ष प्रवेशाची बातमी साफ खोटी असल्याचे ते म्हणाले. मी यासाठी कोणालाही भेटलो नसल्याचे ते म्हणाले.

राजेश टोपे यांची ओळख अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्याचर्चांमुळे राष्ट्रवादीला पुन्हा एक मोठा धक्का बसलो की काय अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजेश टोपे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघाचे आमदार आहेत. घनसांवगी विधानसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना 24 हजार मतांचे लीड मिळाल्यामुळे राजेश टोपे यांची मोठी गोची झाली. यामुळे तीन वेळा आमदार असलेल्या राजेश टोपे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. घनसांवगी हा मतदारसंघ सेनेकडे आहे. यामुळे टोपे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.AM News Developed by Kalavati Technologies