जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिनेश दुबे यांचे कोरोनामुळे मृत्यू

दिनेश दुबे हे अजित पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते

जुन्नर । देशासह महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. दिवसॆंदिवस वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय होत चालला आहे. पुणे जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्याची रुग्णसंख्या ही 282 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत उपचारादरम्यान 7 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.आज सकाळी जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि जेष्ठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते दिनेश भैया दुबे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

दिनेश दुबे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाले होते. यानंतर त्यांच्यावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आज सकाळी कोरोना बरोबरची त्यांची लढाई अखेर अपयशी ठरली. आज पहाटे पुणे येथील खाजगी रूग्णालयात त्यांचे निधन झाले दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. दिनेश दुबे हे अजित पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.AM News Developed by Kalavati Technologies