'...तर कोणताही माइका लाल आम्हाला हरवू शकत नाही' अजित पवारांचा राणेंना टोला

नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.

मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाचा आता राष्ट्रपती राजवट लागली आहे. भाजप सत्ता स्थापनेचा दावा करु शकली नाही. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला राज्यपालांनी निमंत्रण पाठवले. राष्ट्रवादींनी राज्यपालांना 3 दिवसांची मुदत मागितली. मात्र राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस पाठवली. यानंतर राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी वाढला. दरम्यान भाजपा खासदार नारायण राणे यांनी भाजपा सत्तास्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचं सांगितले असल्याचे म्हणाले. यामुळे आता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप जुळवाजुळव करणार हे स्पष्ट आहे. यावर अजित पवारांनी राणेंना टोला हाणला आहे.

नारायण राणे म्हणाले होते की, बहुमताचा आकडा 145 गाठण्यासाठी आमदार जुळवताना इतर पक्षातील आमदार गळाला लावावे लागणार आहे. यावर अजित पवारांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. तसे, सध्याच्या काळात सर्व आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर तीन पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माइकालाल हरवू शकत नाही असे म्हणत त्यांनी नारायाण राणेंना खूलं चॅलेंज दिलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies