नवी मुंबईत दिवसभरात 197 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

तसेच आज दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे

नवी मुंबई | परिसरात आज दिवसभरात तब्बल 197 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 200 इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर 19 रुग्ण, नेरुळ 36 रुग्ण, वाशी 16 रुग्ण, तुर्भे 17 रुग्ण, कोपरखैरणे 35 रुग्ण, घणसोली 36 रुग्ण, ऐरोली 33 रुग्ण, दिघा 5 रुग्णांचा समावेश आहे.

तसेच आज दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाल्यानं कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 205 वर गेला आहे. आतापर्यंत परिसरातील 3 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies