नाथाभाऊचे जळगावात होणार जंगी स्वागत, संपुर्ण शहर झाला बॅनरमय

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जळगाव मोठ-मोठे फलक लावले आहे.

जळगाव । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, आज ते जळगाव जिल्ह्यात परतणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी जळगाव जिल्हा सज्ज झाला आहे. प्रत्येक चौकात रांगोळी टाकण्यात आली असून, संपुर्ण शहरात बॅनर लावण्यात आले आहेत. खडसे यांच्या स्वागतासाठी त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्सुक आहेत. यावेळी महिलांनी जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय पूर्णपणे रांगोळी टाकून फुलांच्या माळांनी सजवले आहे.

तसेच 'कोण आला रे कोण आला राष्ट्रवादीचा वाघ आला' अशी घोषणाबाजी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शुक्रवारी खडसे यांनी मुंबईत आपल्या मनगटावर घड्याळ बांधली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा बळ मिळणार असल्याचे मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.AM News Developed by Kalavati Technologies