नाशिक |संचारबंदीच्या काळात चोरट्यांचा धुमाकूळ, सप्तशृंगी गडावरची दुकाने फोडली

नाशिक संचारबंदीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दुकाने फोडण्यास सुरूवात केली आहे

नाशिक | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश संचारबंदी केली असल्याने सर्वत्र दुकाने बंद आहेत. याच गोष्टीचा फायद्या घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. सप्तशृंगी गडावर भुरट्या चोरांनी दुकान व घरफोडी केल्याची घटना घडली आहे. लाईट नसल्यामुळे संधी साधत चोरट्यांनी एक ठिकाणी हॉटेल व दुसऱ्या ठिकाणी घर फोडले आहेत. हॉटेल गोपालकृष्ण यांचा इंडियन कंपनीचे कमरशेल गॅस टाक्या आणि एका व्यक्तीचे घर फोडून रोख रक्कम 12 हजार तसेच होमथेटरची चोरी केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदरील चोरीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहेत. या चोरींच्या घटनेमुळे सप्तशृंगी गडावर २ पोलीस कर्मचारी असावे व भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी खाडे व शिंदे करत आहेAM News Developed by Kalavati Technologies