मोहन भागवतांनंतर चिस्तीही म्हणातात, मुस्लिमांसाठी भारत सर्वोत्तम देश

भारत देश हा मुस्लिमांसाठी सर्वोत्तम आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी घेतलेली जिहादी भूमिका अतिशय लज्जास्पद आहे.

नवी दिल्ली | कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीरमधील विविध समुदायांची भेट देणाऱ्या सुफी शिष्टमंडळानेही पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत. कलम 370 रद्द केल्यामुळे जळफळाट झालेल्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी जिहादचा नारा दिला होता. यावर भाष्य करताना सुफी शिष्टमंडळातील मुस्लिम विद्वानांनी खान यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या चुकीच्या प्रचारामुळेच दोन देशांमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण होत असल्याचं शिष्टमंडळानं म्हटलं आहे. तसेच भारत हा मुस्लिमांसाठी सर्वोत्तम देश असल्याचे ते म्हणाले आहेत.

मुस्लिम विद्वानांनी काश्मीर भेटीनंतर पत्रकारांसोबत संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'भारत देश हा मुस्लिमांसाठी सर्वोत्तम आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी घेतलेली जिहादी भूमिका अतिशय लज्जास्पद आहे. पाकिस्तानला युद्धाची इतकीच इच्छा असेल, तर त्यांनी पॅलेस्टाईन किंवा चीनमध्ये जावे. आम्हाला त्यांची सल्ल्याची गरज नाही,' अशा शब्दांमध्ये नसीरुद्दीन चिश्तींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. त्यानंत सुफी प्रतिनिधीमंडळाचे सदस्य नसिरुद्दीन चिश्ती यानींही अशाच प्रकारचे वक्तव्य करत भागवतांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या चिश्ती यांनी काश्मीर खोऱ्यातील स्थानिकांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, त्यांना खोऱ्यात मानवाधिकाराचे उल्लंघन झालेले नाही. भारत मुसलमानांसाठी एक चांगला देश असल्याचेही ते म्हणाले. काश्मीर खोऱ्यातील वस्तुस्थिती माहीत करुन घेण्यासाठी अजमेर शरीफ दर्गाचे नसीरुद्दीन चिश्ती यांच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय सुफी सज्जादान परिषदेचे प्रतिनिधी मंडळ तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.AM News Developed by Kalavati Technologies