चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरचे अवशेष सापडले, क्रॅश साइटपासून 750 मीटर अंतरावर होते 3 अवशेष

नासाने रात्री जवळपास 1:30 वाजता विक्रम लँडरच्या इम्पॅक्ट साइडचा फोटो प्रसारित केला आहे.

नवी दिल्ली | अमेरिकेची अंतराळ संशोधन संघटना National Aeronautics and Space Administration(नासा) ने चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरविषयी मोठा खुलासा केला आहे. नासाने ट्विट करत माहिती दिली की, त्याचा लूनर रिकनॅसँस ऑर्बिटर (LRO) ने चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-2च्या विक्रम लँडरचा शोध लावला आहे.

नासाने दावा केला आहे की, चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरचे अवशेष त्याच्या क्रॅश साइटपासून 750 मीटर दूर सापडले आहेत. विक्रम लँडरचे तीन अवशेष सापडले आहे. ते अवशेष 2x2 मीटर दूर मिळाले आहेत. नासाने रात्री जवळपास 1:30 वाजता विक्रम लँडरच्या इम्पॅक्ट साइडचा फोटो प्रसारित केला आहे. त्यांच्या ऑर्बिटरला विक्रम लँडरचे तीन तुकडे मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नासाने सांगितल्यानुसार विक्रम लँडरचा फोटो एक किलोमीटर अंतरावरुन घेण्यात आला आहे. या फोटोमध्ये सॉइल इम्पॅक्टही दिसला आहे. या फोटोमध्ये स्पष्ट दिसतेय की, ज्या ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर पडले आहे. तिथे सॉइल डिसटर्बेंस (पृष्ठभागावर खड्डे) झाले आहे. भारतीय अंतराळ संघटनेने नासासोबत संपर्क केला आहे. विक्रम लँडरच्या इम्पॅक्ट साइटची माहिती मागवण्यात आली आहे. या माहितीनुसार नासा इस्रोला रिपोर्ट सोपवणार आहे. यामध्ये विक्रम लँडर संबंधित जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल.AM News Developed by Kalavati Technologies