नारायण राणे हे 'सुशिक्षित बेरोजगार राजकारणी'- पालकमंत्री गुलाबराव पाटील

भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांना आता कोणतेही काम उरले नाही; त्यांच्या पक्षातही त्यांना काही काम दिले जात नाही- पाटील

जळगाव । भाजपचे नेते नारायण राणे आपल्या वाद विवादाच्या वक्तव्यावरून कायमच चर्चेत राहतात. नुकतेच त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.  'भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांना आता कोणतेही काम उरले नाही. त्यांच्या पक्षातही त्यांना काही काम दिले जात नाही. त्यामुळे ते एक सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत' असा टोला गुलाबराव पाटलांनी नारायण राणे यांना लगावला.

काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी नाणार प्रकल्पावरून शिवसेनेवर टीका केली होती. नाणार प्रकल्प हा शिवसेनेच्या कमवण्याचे साधन आहे, अशी टीका राणेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला गुलाबराव पाटलांनी पलटवार केला आहे. नारायण राणे हे शिवसेनेत असताना मुख्यमंत्री होते. शिवसेनेनं त्यांना खूप काही दिले आहे. पण, त्यांनी कोकणासाठी काहीही केले नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले, यावर राणेंनी बोलूच नये असे गुलाबराव पाटील म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies