नंदुरबार । प्रियकराने मुलीच्या वडलांची केली हत्या कारण...

पोलिसांनी आरोपीला नाशिक येथून केली अटक

नंदुरबार । नवापुर तालुक्यातील खांडबारा येथील शेतकरी भटूलाल परदेशी यांचा 23 फेब्रुवारी रोजी शेतात राहत्या घरी खून झाला होता. भटूलाल आपल्या शेतातील सागवान जातीच्या लाकडांची राखंणदारी करण्यासाठी शेतात राहत होते. लाकडे चोरी करणाऱ्यांनी खून केला असल्याचे तर्कवितर्क लावण्यात येत होते. विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. यात भटू लाल यांच्या मुलीच्या प्रियकराने खून केला असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी देवदत्त उदेसिंग मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला नाशिक येथून अटक केली आहे. आरोपी देवदत्त उदेसिंग याला भटूलाल यांनी मुलीच्या लग्नासाठी नकार दिल्यामुळेच खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. भटूलाल यांची मुलगी व आरोपी पुणे येथे एकाच कंपनीत काम करत होते. दोघांच्या मैत्री नंतर लग्नासाठी मुलीच्या घरच्यांनी नकार दिल्यामुळे प्रियकराने मुलीच्या वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies