नांदेड | बलात्कारप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करावी, आंदोलन करत नागरिकांची मागणी

कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शंकर नगर बंद करून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

नांदेड | बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयात इयत्ता 7 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीवर शिक्षकांकडून बलात्कार करण्यात आला. याच शाळेतील नराधम शिक्षक सय्यद रसूल व दयानंद राजुळे या शिक्षकांनी तिचा मानसिक छळ केला. तसेच अश्लील विडीओ दाखवून धमक्या देऊन तिच्यावर अमानुषपणे बलातकार केला. या प्रकरणी दोन आरोपी आणि दोन साथीदारांवर रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना अटक करून कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शंकर नगर बंद करून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

17 डिसेंबर 2019 रोजी शंकरनगर येथील साईबाबा प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीवर अतिशय निर्दयीपणे आत्याचार करण्यात आला . ज्यात ती गंभीर जखमी झाली आहे.तिला मानसिक धक्का बसून ती एका बाजूने अर्धांगवायूच्या धक्क्याने अपंग झाली आहे. या मुलीची आई विधवा असून सरदील घटनेनंतर पीडित मुलीला अर्धबेशुद्ध तिच्या घरी आणून सोडण्यात आले. या घटनेनंतर मुलीच्या आईने शाळा प्रशासनाला या बाबतीत जाब विचारला असता शाळेतील दोन शिक्षक व प्रदीप पाटील यांनी सदरील महिलेस संस्थाचालकाच्या घरी नेऊन तिच्यावर दबाव आणून तिला व तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन सदरील मुलीला नांदेड येथील क्रिटीकल सेंटर या खाजगी रूग्णालयात दाखल केले.

मागील एक महिन्यापासून या रूग्णालयात त्या मुलीवर कुठल्याही पोलीस यंत्रणेला सूचना न देता वैद्यकीय उपचार होत आहेत. दरम्यान आरोपींचे व शाळा प्रशासनाचे अनेक पदाधिकारी येऊन या महिलेला सदरील बाब इतर कुणालाही सांगू नको, म्हणून दबाव टाकल्या जात होता. ही घटना सामाजिक कार्यकर्त्यांना समजल्याने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या न्यायाच्या मागणीवरून पोलीस प्रशासन हरकतीत आले.

या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा 18 जानेवारी रोजी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. तसेच, पोलीस यंत्रणा सदरील तपास चुकीच्या दिशेने नेण्याचे संकेत दिसत आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व शिक्षकपेशाला तसेच एकूणच शिक्षणक्षेत्राला बदनाम करणाऱ्या या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून शाळा प्रशासनातील व संस्थेतील जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही व्हावी, यासाठी सोमवारी शंकरनगर बंद करून आंदोलन पुकारण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies