नांदेड | अवैध वाळू वाहतुकीच्या रस्त्याच्या वादातून एकाचा खून 

हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे ही घटना घडली आहे

नांदेड | अवैध वाळू वाहतुकीच्या रस्त्याच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे घडली आहे. नदीच्या काठावर त्र्यंबक प्रभाकर चव्हाण व रामदास प्रभाकर चव्हाण यांचे शेत आहे. त्यांना रेती वाहतूक ये-जा करण्यासाठी शेजारच्या शेतातील शिवाजी धोडंबाराव कदम (वय 35) यांच्या शेतातील विद्युत तार अडचण ठरत होती. यामुळे दोघांचा शिवाजी यांच्यासोबत वाद झाला. या वादातूनच त्र्यंबक प्रभाकर चव्हाण व रामदास प्रभाकर चव्हाण यांनी शिवाजी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच डि.वाय.एस.पी. भरतकुमार मुदीराज यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  AM News Developed by Kalavati Technologies