नांदेड | 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

सोनखेड येथे चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची दुर्देवी घटना

नांदेड | लोहा तालुक्यातील सोनखेड येथे चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. बराच वेळ झाला चिमुरडी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी सर्वत्र तिचा शोध घेतला होता. मात्र ती मिळून आली नाही. अखेर चिमुरडीचे पालक नातेवाईक यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. पोलिसांनीही गाव परिसरात शोध घेतला मात्र तपास लागला नाही. याप्रकरणात पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दगडगाव रस्त्यालगत एका शेतात सदर चिमुरडी रडत असल्याची शेतकऱ्यांना दिसली. त्यांनी सदर चिमुरडीस तिच्या घरी आणून नातेवाईकांना सुपुर्त केले. नातेवाईकांनी चिमुरडीस सोनखेड पोलिसात आणल्यानंतर तिला वैदयकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी चिमुरडीवर अत्याचार झाला असल्याची माहिती समोर आली.

चिमुरडी केवळ पाच वर्षांची असल्याने ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच तिच्या कानातील सोन्याचे दागिने आरोपीने काढून घेतले आहे. याप्रकरणी सोनखेड पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोनखेड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक मगर यांनी चिमुरडीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. दिली तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक तयार करून रवाना करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सदरील घटनेच्या निषेधार्थ सोनखेड येथील व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली होती. आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies