माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येतील दोषी नलिनाचा आत्महत्येचा प्रयत्न..

29 वर्षांपासून तुरूंगात असून, काल रात्री तिने आत्महत्येचा प्रयत्न केला

दिल्ली । देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनी श्रीहरनने वेल्लोर तुरुंगामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलं आहे. दोषी नलिनी सध्या तामिलनाडू येथील वेल्लोर महिला तुरुंगात आहे. देशाचे माजी पंतप्रधान यांच्या हत्येत हात असल्याने नलिनाला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काल रात्री जेलरसोबत शाब्दिक वाद झाल्याने तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. असे तिचे वकिल पी.पुगाझेंडी यांनी सांगितले आहे. नलिनाला ज्या कक्षात बंधिस्त आहे त्याच कक्षात आणखी एक कैदी असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते. त्यामुळे तिला दुसऱ्या कक्षात हलवण्यात यावे अशी नलिनाची मागणी होती, आणि त्याच कारणावरून जेलरसोबत तिचा वाद झाला होता. वादानंतरच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.AM News Developed by Kalavati Technologies