नागपूर । महापालिकेने काढले कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याचे परिपत्रक

सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस राहणार

नागपूर । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवस कामकाजाचा आठवडा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर, नागपूर महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याचे परिपत्रक काढले आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे परिपत्रक जारी केले आहे. 29 फेब्रुवारी पासून नागपूर महापालिकेत 5 दिवसांचा आठवडा कार्यान्वयीत होणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेच्या सर्वसामान्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू होणार आहे. सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस राहणार आहेत. कार्यालयाच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात आली असून कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 अशी कामकाजाची वेळ राहणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies