Nagar Corona : अहमदनगरमध्ये आज 646 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 9 हजारांच्या पार

सध्या जिल्ह्यात 3274 रुग्णांवर सुरू असून; 5866 जणांना रुग्णलयातून सुट्टी देण्यात आली आहे

अहमदनगर । अहमदनगर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात जिल्हयात तब्बल 646 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 9240 वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यात 3274 रुग्णांवर उपचार सुरू असून, 5833 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हयात कोरोनामुळे 100 जणांचा बळी गेला आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता नगरकरांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies