लेक सतत माहेरी येते म्हणून पित्यानेच केली हत्या, बीडच्या वडवणीतील खुनाचा 24 तासांतच उलगडा

१४ वर्षीय अल्पवयीन विवाहितेचे खून प्रकरण, पित्याने आईसमोरच दाबला लेकीचा गळा

बीड । सासरी नांदत नाही नेहमी माहेरी येते म्हणून  जन्मदात्यानेच स्वत:च्या मुलीचा गळा आवळून खून केला आहे. वडवणी पोलीसांनी चोवीस तासात खुनाचा उलगडा केला असुन आरोपी पित्यास अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील चिखलबीड येथील शितल दादासाहेब तोगे (वय १४ वर्षे) ही अल्पवयीन विवाहिता २७ जूनपासून घरातून बेपत्ता होती. तिचा मृतदेह तिचे माहेर असणाऱ्या पिंपळा शिवारात एका उसाच्या शेतात आढळल्याने खळबळ उडाली होती.

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार अल्पवयीन विवाहितेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेत वडवणी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, पित्यानेच लेकीचा खून केल्याचे काल (दि.०१ रोजी) पोलीस चौकशीत समोर आले आहे. नेहमी माहेरी येते म्हणून वैतागलेल्या पित्याने आईसमोरच अल्पवयीन विवाहितेचा गळा दाबून खून केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक महेशकुमार टाक यांनी अवघ्या चोवीस तासांत उलगडा केला असून आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies