महापालिका तुकाराम मुंढेकडून कोविड सेंटरची पाहणी, रुग्णासोबत साधला संवाद

महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज नागपूरातील विविध कोविड केअर सेंटर्सची पाहणी केली.

नागपूर | महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज नागपूरातील विविध कोविड केअर सेंटरची पाहणी केली. शिवाय सेंटर मधील सद्यस्थितीबाबत माहीती घेऊन त्रुटी बाबत अधिकाऱ्यांना सुचनाही दिल्या. यात प्रामुख्याने शहरातील तीन कोविड केअर सेंटर्सला मुंढेनी भेट दिली. त्यानंतर ते आमदार निवासात असलेल्या कोविड सेंटरची पाहणी करून रुग्णांसोबत संवादही साधला.

नागपूरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसे दिवस वाढ होत असली तरी बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यात कोविड केअर सेंटरमुळे अधिक मदत मिळत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. शिवाय या सेंटर्सवर काम करणारे कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या कामामुळे परिस्थितीवर बहूतांश प्रमाणात नियंत्रण करण्यास मदत मिळत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे देखील अभिनंदन यावेळी तुकाराम मुंढे यांनी केले. त्याचबरोबर कोविड टेस्टिंग सेंटरला देखील आयुक्तांनी भेट दिली. या सेंटरमध्ये रूग्णांना सर्व सुविधा मिळत आहेत का शिवाय कर्मचारी कशा पद्धतीने काम करत आहे याचीही पाहणी केल्याचे मुंढे यांनी सांगितले.

त्याचबरोबर शहरातील 21 टेस्टिंग सेंटर्समुळे नागरिकांना व प्रशासनाला मोठी मदत मिळत असल्याचेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे सेंटर्सवर काही समस्या असेल तर त्या दूर करण्यासाठी हा पाहणी दौरा असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. शिवाय शहरातील कोरोना रूग्ण संख्येवर आळा घालण्याचा प्रयत्न आमचा सातत्याने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोना बाबत काही लक्षणे आढळल्यास ते न लपवता नागरिकांना स्वतः टेस्टिंग सेंटरला भेट देऊन तपासणी करावी. असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.



AM News Developed by Kalavati Technologies