दिवाळीत फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला 14 कोटींचा दंड

फुकट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई | दिवाळीत प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते. यंदाची गाड्यांमध्ये प्रवाशांनी गर्दी केली होती. मात्र यंदाच्या दिवाळीत फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. फुकट प्रवाशांविरोधात केलेल्या विशेष कारवाईमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 41 हजारांनी वाढ झाली आहे. या कारवाईमध्ये तिकीट तपासनीसांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जवळपास 14 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासोबतच, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात फुकट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दिवाळीच्या सुट्टयांमध्ये कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाढी घेण्यासाठी सर्वच बाहेर पडतात. यामुळे रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने दिवाळी आणि छटपूजेच्या कालावधीमध्ये विशेष कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. या अंतर्गत, मध्य रेल्वेवर 21 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत विनातिकीट प्रवास केल्याबद्दल एकूण दोन लाख 40 हजार 754 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून तिकीट तपासनीसांनी 13 कोटी 94 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या दिवाळीमध्ये (1 ते 12 नोव्हेंबर) एक लाख 99 हजार 812 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून 11 कोटी 68 लाखांची वसूली मध्य रेल्वेकडून करण्यात आली होती. तिकीट तपासनीसांची कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies