चीनला मागे टाकत मुंबई अव्वल क्रमांकावर ! आकडेवारीने वाढवली चिंता

राजधानी मुंबईत दिवसेंदिवस वाढतोय धोका, मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 85 हजार 724 वर

मुंबई । चीनपासुन सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने साऱ्या जगात धुमाकुळ घातले आहे. त्याला भारतही अपवाद राहिलेला नाही. भारतामध्ये वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. त्यातच मुंबईच्या आकडेवारीने आता आणखीनच चिंतेत भर टाकली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईने चीनला सुद्धा मागे टाकले आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 85 हजार 724 गेला असुन, कोरोनाचा जन्म जेथे झाला त्याच्या मुळगावी म्हणजेच चीनची रुग्णसंख्या 85 हजार 320 इतकी आहे. बळीमध्ये सुद्धा मुंबई काही मागे राहिलेली नाही, आतापर्यत चीनमध्ये 4 हजार 648 जणांना आपला जीव गमवला असुन, एकट्या मुंबईमध्ये 4 हजार 938 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाला आणखीनच मेहनत करावी लागणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies