मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात बंदोबस्त वाढवला

सदरील कॉल पाकिस्तानमधून आला असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे.

मुंबई | मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल बॉम्बस्फोटाने उडवून देणार असा धमकीचा कॉल आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदरील कॉल पाकिस्तानमधून आला असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. काल, मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा धमकी देणारा कॉल आला होता. याशिवाय मुंबईतील कुलाबा आणि ताज लँड्स एंड या हॉटेलांनाही धमकीचे फोन आले होते. यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असलेले ताज हॉटेल बॉम्बने उडवून देऊ असा धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा धमकीचा कॉल आल्यानंतर कॉलवरून अज्ञात व्यक्तीने मी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा दहशतवादी असून, हॉटेल बॉम्बस्फोटाने उडवून देऊ. नोव्हेंबर 2008 मध्ये ज्या प्रकारे हल्ला केला होता, तसाच हल्ला करू, अशी धमकी समोरून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दिली. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था तातडीने वाढवण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies