Mumbai Landslide : कांदिवलीत पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली; महामार्गावरील वाहतूक ठप्प

पावसामुळे मुंबईतील कांदिवली डोंगराचा भाग कोसळला; महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहने फाउंटन येथून वळवण्यात आली आहे

मुंबई । मुंबईत काल रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले. मुंबई शहरातसह अनेक भागात पाणी साचले आहे. तर अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मुंबईचा वेग काहीप्रमाणात मंदावला आहे. तर पश्चिम महामार्गावरील कांदिवली डोंगराचा काही भाग कोसळला आहे. त्यामूळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असुन, मोठ्या प्रमाणात माती आणि दगडाचा ढिगारा  साचला आहे. तात्पुरती ही वाहतूक फाउंटन येथून वळवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies