Mumbai Rain Update: मुंबापुरीला पावसाने झोडपलं; आजही पावसाचा जोर कायमच राहणार

मुंबईत शुक्रवारपासून पावसाची दमदार बॅटिंग सूरू असून, येत्या 24 तासात उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

मुंबई । मुंबईत शुक्रवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई-ठाण्यासह नवी मुंबईलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. नवी मुंबईत आजही पावसाचा जोर कायमच आहे. हवामान विभागाकडून आज मुंबईसह रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने, वाहनांचा वेग मंदावला आहे. येत्या 24 तासात उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणादेखील सतर्क झाली आहे.

दरम्यान, काल राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. येत्या 48 तासात विदर्भासह कोकणात मुसळधार तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशार हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies