20 बँकांची फसवणूक करणाऱ्या 6 आरोपींना मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींनी 2 करोड रुपये लाटले

20 बँकांची फसवणूक करणाऱ्या 6 आरोपींना मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींनी 2 करोड रुपये लाटले

 मुंबई । सध्या लोकांना लुबाडने म्हणजे अगदी किरकोळ गोष्ट बनली असल्याचे दिसत आहे. एखाद्याची फसवणूक करून अगदी सहजपणे आरोपी फरार होताना दिसतात. मात्र, मुंबईत एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. चक्क बँकांना चुना लावून आरोपींनी 2 करोड रुपये लाटल्याचे समोर आलं आहे. बनावट सोने बँकेत गहाण ठेवून तब्बल 20 बँकांची फसवणूक करणाऱ्या या 6 आरोपींना मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने बेड्या ठोकल्यात आणि त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली.

बँकांना मूर्ख बनवून बनावट सोने बँकेत गहाण ठेवून पैसे लाटणारी एक टोळी सक्रिय झाल्याची माहिती मुंबई पोलीसांच्या मालमत्ता कक्षाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या टोळीतल्या एकूण 6 जणांना पोलिसांनी अटक केली. सोन्याचा मुलामा दिलेले दाडीने आरोपी बँकेत ठेवत होते. आतापर्यंत त्यांनी जवळपास 2 करोड रुपये बँकांकडून घेतले असल्याचे समोर आलं आहे. बँकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलीसांना यश आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी आतापर्यंत महिंद्रा कोटक बँकेसह इतर अनेक बँका आणि सहकारी संस्थांना देखील फसवल्याच समोर आलं आहे. रमेश रामवतार सोनी, दिनेश रामवतार सोनी, बिमल रामवतार सोनी, अनिलकुमार गुलाबचंद स्वामी, प्रशांत सुंदरेशन नारायण, नितु सतिशल निलयील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यामध्ये एका महिला आरोपीचा देखील समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 24 जुलैपर्यँत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले असून अशाप्रकारे बँकांनाच गंडा घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.AM News Developed by Kalavati Technologies