सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस सक्षम - राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

मुंबई पोलीस सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सक्षम असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोजच नव-नवीन विधाने राजकीय मंडळी करतात. आज पुन्हा या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार म्हणाले की, "मी मुंबई पोलिसांना गेली 50 वर्षांपासून ओळखतो. मुंबई पोलीसांवर माझा विश्वास आहे की, हा प्रकरण ते नक्कीच मार्गी लावतील. सध्या जी चर्चा सुरू आहे, ती चर्चा योग्य नाही" तसेच सुशांतने आत्महत्या केली ही खुप दुर्दैवी घटना आहे. मात्र, शेतकरी आत्महत्याकडे कुणीही चर्चासुद्धा करायला तयार नाही" जर एखाद्याला वाटत असेल की, सीबीआय चौकशी व्हावी; तर त्याला माझा विरोध नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आपल्या नातावाने केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्वव आहे' अशा शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies