मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच.. कंगनाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी मुंबई संदर्भात एक ट्विट केला होता त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे

मुंबई । अभिनेत्री कंगना रनौत आणि संजय राऊत याचं ट्विटर युद्ध काही थांबायला तयार नाही. काही वेळापुर्वीच कंगनाने ट्विट केला होता. आणि त्या ट्विटला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कंगनानं ट्विट करत सांगितले होते की, "मी मुंबईत पाय ठेऊ नये अशा धमक्या मला मिळत आहे. मी येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर अडवून दाखवा" असा ट्विट कंगनानं केलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत ट्विट केले आहे की, "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे.ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise.जय हिंद जय महाराष्ट्र" असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौत मुंबई पोलीसांवर सातत्याने टिका करीत होती. मुंबई पोलीस सुशांतसिंह प्रकरणाचा तपास नीट करीत नसल्याचा आरोप कंगनानं केला होता. तेव्हापासून कंगना सुशांत प्रकरणात चर्चेत आहे.AM News Developed by Kalavati Technologies