अमृता फडणवीस म्हणतात; "मुंबईने माणुसकी गमावली आहे, ती सुरक्षित राहिली नाही"

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी; अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणात घेतली उडी

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन तपास सुरू केल्यानंतर मुंबई महापालिकेने बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला सक्तीने क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र आपली नाराजी व्यक्त केली आहे. बिहार पोलीस आपले काम करत आहेत, यात कोणतेही राजकारण नसल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अमृता फडणवीस ट्विटमध्ये म्हणाल्या की, "मुंबईत आता स्वाभिमानी आणि साध्या लोकांचं जगणं सुरक्षित नाही आहे"
खरंतर, सुशांतच्या आत्महत्येनंतर तपासात रोज नवीन खुलासे होत आहेत. यावर अनेक राजकीय नेते आणि दिग्गज आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. पण आता मात्र यातून वेगळंच राजकारण पेटण्याची शक्यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies