मुंबई । मॉर्निंग वॉकद्वारे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

मुंबईत मुख्यमंत्र्यांचा मॉर्निंग वॉकद्वारे प्रचार

मुंबई ।  विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस राहिल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने प्रचार सुरु आहे. भाजपने आता 'मुंबई चालली भाजपसोबत' असं अभियान राबवून प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपच्या नेत्यांसह सर्वच पदाधिकारी या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक करत प्रचार केला. 

'जे वर्षावर नेणार आहेत, त्यांच्यासोबतचा हा वॉक होता', असं म्हणत रविवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरिन ड्राईव्ह परिसरात जनतेसोबत मॉर्निंग वॉक करताना दिसले. कुलाबा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या या परिसरात मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. भाजपने मुंबई चाले भाजपासोबत असे अभियान राबवून मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक सुरु केला. फडणवीस यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुलाबा विधानसभेचे उमेदवार राहुल नार्वेकरही उपस्थित होते. तर मुंबईतील अन्य भागातही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मॉर्निंग वॉक करत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांसोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies