मुंबईत 50 घरफोड्या, अट्टल गुन्हेगाराला अटक 34 गुन्हे दाखल

आरोपी मूळचा उस्मानाबादचा

मुंबई । मुंबईतल्या विविध भागात घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला वरळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबई शहरातच तब्बल 34 गुन्हे दाखल असल्याचे समोर आलं आहे. अटक आरोपी हा फक्त कार्यालयीन इमारतींना मोठ्या प्रमाणात टार्गेट करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी मूळचा उस्मानाबादचा असून तो रात्रीच्या वेळी मुंबईतल्या ठिकठिकाणी फिरून घरफोडी करत होता.

वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिन्याआधी त्याने एका दुकानातून 60 हजार रुपये चोरले होते. त्या दिशेने वरळी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील यांच्या पथकामर्गत या गुन्ह्याचा तपास सूरु होता. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्या शोधासाठी मुंबईतल्या अनेक पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली होती. 7 तारखेला आरोपी हा वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवून तो दिसताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चौकशीदरम्यान, मुंबईतील एकूण 34 गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, इतर परिसरातल्या पोलीस ठाण्याचे रेकॉर्ड सध्या तपासले जात आहे. सलीम सिकंदर शेख असे या (55 वर्षीय) अटक आरोपीचे नाव असून सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies