करमाळा - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल यांची घेतली भेट

राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पडावे अशी मागणी पत्रामध्ये केली आहे

मुंबई | खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे ,आमदार राहुल कुल ,यांनी राजभवन येथे राज्यपाल कौशियारी यांची भेट घेऊन कोरोना यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. आपण यामध्ये तातडीने जातीने लक्ष घालावे अशी विनंती केली. देशामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने उग्ररूप धारण केला असताना देशाच्या कोरोनाच्या रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अत्यंत बेफिकीर दिसत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालले असताना राज्य सरकार यामध्ये कोणतेही ठोस निर्णय घेतलेले दिसत नाहीत. मोल मजुरांचा प्रश्न असेल, कोरोणा पेशंटच्या संदर्भामध्ये हॉस्पिटलमध्ये असणारी दुरवस्था असेल, रेशन वाटप असेल, व्यवसाय सुरू करण्याबाबत असेल, सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही लोकप्रतिनिधी व प्रशासन एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेताना दिसत आहेत. राज्य सरकार विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाही, विरोधी पक्षाने दिलेल्या सल्ल्यांचा साधा विचार सुद्धा करत नाही, केंद्र शासनाने दिलेली आर्थिक मदत ती सुद्धा अजून वापरली गेलेली नाही किंवा त्याची माहिती दिली जात नाही, नुसत्या बैठका घेतल्या जातात परंतु निर्णय घेतले जात नाहीत. मुख्यमंत्री कुठे महाराष्ट्र मध्ये याबाबत दौरा करताना दिसत नाहीत, लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस उपाय नाही त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. यावर ठोस भूमिका घेतली जात नाही.

कोरोना आजारी पेशंटचे टेस्ट किती घेता हे समजत नाही राज्यशासन वस्तूस्थिती लपवत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांमध्ये सुद्धा प्रशासनाचा कोणताही ठोस उपाय या आजारावर दिसत नाही, राज्यामध्ये उपासमारीची वाढ झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोन टाइन करण्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध शासनाने केलेल्या नाहीत. त्या मध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा नीट नाही स्वच्छता नाही अशा अनेक बाबी राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले आहेत व आपण यावर तातडीने लक्ष घालून राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पडावे अशीही मागणी या पत्रामध्ये केली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies