जीवापेक्षा पेट्रोल जास्त, कोरोनाचे संकट असतांना बीडकरांचा हलगर्जीपणा

कोरोनाची दहशत असतांना पेट्रोल पंपावर एकत्र गर्दी करून 'आ बैल मुझे मार' अशीच स्थिती

बीड | कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार घातला आहे. कोरोनाबाबत खबरदारी म्हणून देशासह राज्यातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सुचना प्रशासनाने वारंवार दिल्या असतांना देखील काही टवाळखोर घराबाहेर पडतच आहे. दरम्यान आज वडवणीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीस्वारांनी एकच गर्दी केली होती. कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य न पाळता या नागरिकांची दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी धडपड सुरू होती. सध्या कोरोना व्हायरसमुळे गर्दी करणे टाळले पाहिजे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत सतर्क राहावे, या गोष्टीचे भानही या नागरिकांना राहिलेले दिसत नाहीये. मरणापेक्षा पेट्रोल जास्त अशी यांची स्थिती झालेली दिसत आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात आले असले तरी मात्र दुचाकीस्वार या गोष्टीचा मोठा फायदा घेत आहे. कोरोनाची दहशत असतांना पेट्रोल पंपावर एकत्र गर्दी करून 'आ बैल मुझे मार' अशीच स्थिती या नागरिकांनी निर्माण केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies