मोदी सरकार देणार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानला भारतात येण्याचे निमंत्रण

भारत आणि पाकिस्तान हे दोघेही जून 2017 मध्ये एससीओचे पूर्ण सदस्य झाले.

नवी दिल्ली ।  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले जाईल, या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) चे यजमानपद भारताकडे असेल. म्हणून सदस्य देशाचे अध्यक्ष असल्याने मोदी सरकार या बैठकीसाठी इम्रान खानला निमंत्रीत करेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याची पुष्टी केली आहे. दोन्ही देशांमधील वाटाघाटी थांबल्यानंतर इम्रान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही कार्यक्रमात एकत्र येण्याची ही पहिली वेळ असेल.

परराष्ट्र मंत्री सहसा एससीओमधील सरकार प्रमुखांच्या बैठकीत उपस्थित राहतात. तथापि, काही देशांचे पंतप्रधानही यात सहभागी होतात. भारताबद्दल बोलताना, परराष्ट्रमंत्री आपल्या वतीने सरकारांच्या प्रमुखांच्या बैठकीत भाग घेतात, तर पंतप्रधान एससीओच्या राज्य प्रमुखांच्या बैठकीला जातात. पाकिस्तानदेखील एससीएओचा सदस्य असल्याने त्यांच्याकडून कोण भारतात येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या बैठकीला उपस्थित राहतील की नाही याबाबत इस्लामाबाद अंतिम निर्णय घेईल. या वर्षाच्या अखेरीस, एससीओची सालन बैठक आयोजित केली जाईल. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही जून 2017 मध्ये एससीओचे पूर्ण सदस्य झाले.AM News Developed by Kalavati Technologies