मोदी सरकारमुळे देशातील तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले - राहुल गांधी

देशात लॉकडाऊनच्या काळात लाखो तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असल्याचं मत राहुल गांधींनी केले आहे

नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांपासून, मोदी सरकारच्या पोलखोलींसाठी मालिका सुरू केली आहे. आज राहुल यांनी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, जीडीपी आणि बेरोजगारीच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारवर निशाना साधला आहे. राहुल यांनी ट्वीट करत मोदी सरकारच्या योजनांची पोलखोल केली आहे. काँग्रेसच्या नेत्याचं मत आहे की, मोदींमुळे देशातील लाखो तरूण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे बेरोजगार झालेल्या तरूणांनी #SpeakUpForJob या ट्विटर मोहिमेत सामील होण्याचे आवाहन राहुल यांनी देशातील तरुणांना केले आहे.

आपल्या ट्विटर संदेशात राहुल यांनी लिहले आहे की, केंद्रातील मोदी सरकारमुळे देशातील लाखो तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सोबतच देशातील जीडीपीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे देशातील तरुणांचं भविष्य अंधकारमय झालं आहे. त्यामुळे मोदी सरकारला जाग आणण्यासाठी आपण #SpeakUpForJob या मोहिमेत सामील होऊन सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करू असे राहुल गांधींनी सांगितले आहे.

दरम्यान, यापुर्वीही राहुल गांधी यांनी कोरोनावर आपले भाष्य केले होत. बुधवारी त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात मोदींवर निशाना साधत म्हटले होते की, "21 दिवसात मोदी कोरोनाला हद्दपार करणार होते. मंग देशातून कोरोना का हद्दपार झाली नाही" असा सवाल राहुल यांनी मोदी सरकारवर उपस्थित केला होता.AM News Developed by Kalavati Technologies