PoK मधून आलेल्या 5300 काश्मिरी कुटुंबांसाठी मोदी सरकारची घोषणा, मिळणार 5.5 लाख

या 5300 कुटुंबाचे नाव सुरुवातीला विस्थापितांच्या लिस्टमध्ये नव्हते.

नवी दिल्ली | मोदी सरकारने बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले. केंद्र सरकारने पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधून विस्थापित होऊन भारताच्या अनेक राज्यांमध्ये वसलेल्या 5300 कुटुंबांना दिवाळीची भेट दिली आहे. आता या कुटुंबांना केंद्रांकडून साडे पाच लाख रुपयांची आर्थिक सहाय्यता दिली जाणार आहे. याची मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती.

या 5300 कुटुंबाचे नाव सुरुवातीला विस्थापितांच्या लिस्टमध्ये नव्हते. मात्र आता सरकारने निर्णय घेतला आहे की, त्यांचे नाव लिस्टमध्ये समाविष्ट केले जाईल आणि त्यांना आर्थिक सहाय्यता दिली जाईल.

या 5300 कुटुंबांमध्ये तीन प्रकारच्या कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये काही कुटुंब 1947 च्या फाळणीवेळी आले. काही काश्मीरचे विलिनीकरण काढल्यानंतर आले तर काही पाकिस्तानी हे अधिकृत काश्मीरातून भारतात आले होते. हे कुटुंब काश्मीरपासून वेगळ्या राज्यांमध्येही वसले होते.

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकव्याप्त काश्मिरातून आलेल्या लोकांसाठी 5.5 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र तेव्हा या 5300 कुटुंबांना लाभ मिळाला नव्हता. आता केंद्रीय कॅबिनेटने या कुटुंबांनाही ही सहाय्यता राशी देण्यास मंजूरी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies