मनसेच्या इंजिनची दिशा होणार स्पष्ट, आज होणार महाअधिवेशन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. हेच निमित्त साधून मनसेकडून गोरेगावला महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज गुरुवारी गोरेगाव येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील बदलत्या राजकीय घडामोंडीवर भाष्य करणार असल्याच्या चर्चा आहेत. यासोबतच मनसे आपली नवी दिशा आज स्पष्ट करणार असल्याच्याही चर्चा आहेत. यासोबतच पक्षाचा नवा झेंडाही स्पष्ट करणार असल्याचे बोलले जाते.

शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केले. यामुळे शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा दुर्लक्षित झाला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेवर टीकाही केली जात आहे. मात्र आता याचा फायदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेत आहेत. मनसे आता प्रखर हिंदुत्वाच्या मुद्दा लावून धरणार आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून मनसेची ही नवी दिशा सर्वांच्याच समोर येईल.

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. हेच निमित्त साधून मनसेकडून गोरेगावला महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींवर भाष्य करतील. यासोबतच ते स्वातंत्र्यवीर सावरकर, समान नागरी कायदा यासारख्या प्रश्नावरून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कसे दुर्लक्ष करत आहेत यावरही लक्ष केंद्रीत करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबत महाअधिवेशनाच्या माध्यमातून पक्षाचा नवा झेंडा आणि पक्षाची नवी भूमिका देखील राज ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.



AM News Developed by Kalavati Technologies