मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन

खोट्या केसेसेस आणि नोटीसा यांची आपल्याला सवय असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी सक्तवसुली संचालयाने नोटीस पाठविल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. 22 ऑगष्ट रोजी राज ठाकरे यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे 22 ऑगष्टला मनसे कार्यकर्ते ईडी कार्यलायाबाहेर शांततेत आंदोलन करणार होते. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. खोट्या केसेसेस आणि नोटीसा यांची आपल्याला सवय असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

“राजगडावर आमची बैठक पार पडली होती. ईडीच्या कार्यालयाबाहेर जावं असं आवाहन यावेळी कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना करण्यात आलं होतं. पण राज ठाकरेंसोबत आमची बैठक झाली असता कोणीही ईडीच्या कार्यालयाबाहेर येऊ नये असा आदेश त्यांनी दिला आहे. तशी सक्त ताकीदच त्यांनी दिली आहे. शांततेत हे प्रकरण पुढे न्यायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे”, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. सामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

कोहिनूर मिल प्रकरण नेमके काय?
राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी मिळून दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केलेली आहे. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी 2008 साली या प्रकरणी आपले सर्व शेअर्स विकले होते. मात्र, त्यानंतरही राज ठाकरे या कंपनीत सक्रिय असल्याचे सांगत याप्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies