कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य वाटतो - राज ठाकरे

एन्काउंटरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी समर्थन केले आहे.

मुंबई | हैद्राबाद येथे हृदय हेलावून टाकणाऱ्या बलात्कार प्रकरणामुले देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर हैद्रबाद पोलिसांकडून त्या चारही आरोपींचे एन्काउंटर करण्यात आले आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या झालेल्या एन्काउंटरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी समर्थन केले आहे. राज यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले आहे. कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे.

हैदराबादमध्ये पशुवैद्यक असलेल्या तरुणीवर चार तरुणांकडून बलात्कार करण्यात आला होता. यानंतर आरोपींनी या तरुणीची हत्या केली. तसेच तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी पहाटे हैदराबाद पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी पुराव्यांची खातरजमा करण्यासाठी नेले होते. यावेळी आरोपींना पोलिसांकडील शस्त्रे हिसकावली. तसेच ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी बंदुकीतून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याच वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबार केला. या गोळीबारात चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे.

चारही आरोपींवर गोळ्या झाडण्यात आल्यामुळे देशभरातील सामान्य नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मात्र कायदेतज्ञ आणि काही नागरिकांकडून या घटनेचा विरोध केला जात आहे. कायदेशीरित्या त्यांना शिक्षा व्हायला हवी होती असे मत काहींनी व्यक्त केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies