लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्याच्या वीजबिलात 1500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार

कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा, 8 दिवसाच्या आत कारवाईला सुरुवात करावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल - वंचित बहुजन आघाडी

अमरावती । कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत वीज कंपन्यांनी ग्राहकांच्या मस्तकी बोगस वीजबील मारल्याचे निर्दशनास आलेले आहे. हजारों ग्राहकांच्या स्थानिक वीजवितरण कार्यालयासमोर अनेक तक्रारी आलेल्या आहेत. विज निर्मीती केंद्र वीज कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातील देयकांच्या भरणाचे समायोजन करतांना 100 टक्के रकमेचे समायोजन केलेले नाही. वीज ग्राहकांनी जितका भरणा केला त्यातील किमान 400-500 रुपयांची विविध प्रकारची गोळाबेरीज करुन कापुन घेतले आहेत. राज्यात अंदाजे 3 कोटी महावितरणाचे ग्राहक आहेत. प्रतिग्राहक 400 रुपयानुसार महावितरण ने 1200 कोटी वसुल केलेले आहेत. व इतर कंपन्यांनी जवळपास 300 कोटी वसुल केलेले आहेत. हा गैरव्यवहार जवळपास 1500 कोटींचा झालेला दिसतो.
तीन महिन्यांचे सरासरी वीज देयके पाठवुन वीज कंपन्यांनी वीज कायद्यांचे उल्लंघन केले आहेत. आणि विजेचे दर ही अवाजवी वाढवलेले आहेत. विश्वासाहर्ता आणि पारदर्शिपणा येण्यासाठी सर्व वीज कंपन्यांचे सोशल ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे भ्रष्टाचारावर अंकुश लावता येईल. आणि दोषी कंपन्यांवर कार्यवाही करता येईल. गंभीर दखल घेऊन 8 दिवसाच्या आत कार्यवाहीस सुरुवात करावी अन्यथा भ्रष्ट विज कंपन्या व महाराष्ट्र सरकार विरुद्ध संवैधानिक मार्गाने व्यापक जन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडी व विदर्भ जनआंदोलन समितीने वीज वितरण कंपनी दिला.AM News Developed by Kalavati Technologies