पूरग्रस्त जनतेबरोबर जनावरांचीही काळजी घेत असल्याची मंत्री महादेव जानकर यांची माहिती

पूरग्रस्त जनतेबरोबर जनावरांचीही काळजी घेत असल्याची मंत्री महादेव जानकर यांची माहिती

कोल्हापूर । अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात विस्थापित झालेल्या पूरग्रस्त जनतेच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे. याचबरोबर जनावरांचीही काळजी घेत असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील कन्या विद्या मंदिर शाळेतील पूरग्रस्त छावणीला आज मंत्री जानकर यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. अरुण चौगुले, सहाय्य‍क आयुक्त डॉ. विनोद पवार, डॉ. सुरेश कचरे, अप्पासाहेब सुतार, बाळासाहेब कुशाप्पा आदी उपस्थित होते.

 जानकर म्हणाले, जनतेने या आस्मानी संकटात घाबरुन न जाता या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. या संकटावर मात करण्यासाठी शासनही आपल्याबरोबर असून शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत पुरविली जात आहे. पूरग्रस्त जनतेबरोबर जनावरांचीही काळजी शासनाकडून घेतली जात आहे. यासाठी जनावरांच्या छावण्याही उभारल्या आहेत. यावेळी  मंत्री जानकर यांच्या हस्ते पूरग्रस्तांना चहा व दुधाचे वाटपही करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies