वाशिममध्ये लाखो रुपयाचे प्लास्टिक जप्त

कारवाईमुळे प्लास्टिक विकणाऱ्यांमध्ये भिती पसरली आहे.

वाशिम । राज्यात प्लास्टिक बंदी आहे. मात्र, अजूनही प्लास्टिकचा सर्वत्र सर्रास वापर केला जात आहे. आज वाशिम शहरात नगर पालिकेने आशा पॉली या दुकानावर धडक कारवाई करीत लाखोंचे प्लास्टिक साहित्य जप्त केले आहे. सदर कारवाई महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल उत्पादन अधिनियमानुसार करण्यात आली असून ही धडक मोहीम अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे. वाशिम शहरात प्लास्टिक जप्तीच्या मोठ्या कारवाईमुळे प्लास्टिक विकणाऱ्यांमध्ये भिती पसरली आहे.AM News Developed by Kalavati Technologies