भरधाव टिप्परच्या धडकेत दूचाकीस्वार जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी

तूषार रामचंद्र धूमनखेडे( 40) रा मलिदा असे मृत ईसमाचे नाव आहे

भंडारा । जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मलीदा येथून नातेवाईच्या लग्न सभारंभ कार्यक्रमाला गोंदिया येथे जात असताना तिरोडा येथे न्यायालयाच्या समोरुन गोंदिया येथे जात असलेल्या भरधाव ट्रक (एम एच 40 बी एल 2867) या क्रमांकाच्या टिप्परने तिरोडा गोंदिया महामार्गावर दुचाकी (एम एच 36 ई 4569) या क्रमांकाच्या मोटारसायकलला मागेहून जोरदार धडक दिली. त्यात दूचाकीचालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तूषार रामचंद्र धूमनखेडे( 40) रा मलिदा असे मृत ईसमाचे नाव आहे.

तर मृतकाची पत्नी दूचाकीवर मागे बसली होती. तिला गंभीर दूखापत झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सूरू आहेत. तूषार रामचंद्र धूमनखेडे हा मलिदा (आंधळगाव) येथील रहिवासी असून तो आपल्या पत्नी सोबत दूचाकीने गोंदिया येथे नातेवाईकांच्या लग्न सभारंभ कार्यक्रमाला शूक्रवारी जात असताना तिरोडा येथे महामार्गालगत असलेल्या न्यायालयाच्या समोर भरधाव टिप्परने मागेहून तूषारच्या दूचाकीला धडक दिली. त्यात तो गंभीर झाला होता परंतू त्याला उपचारार्थ गोदिंया येथिल रूग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मूली, वडील, आई, असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies