भाजपमध्ये मेगानाराजी? एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

रॉयलस्टोन या शासकीय निवास्थानी ही दोन्ही नेत्यांमध्ये भेट होत आहे

मुंबई । विधानसभा निवडणूक आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान काल पकंजा मुंडे यांच्या भेटीनंतर विनोद तावडे यांनी आज एकनाथ खडसे यांची भेट घेतली. मात्र पक्षात कुठलाही वेगळा मतप्रवाह नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. अशातच आता एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी घरी पोहतचले आहेत. नाराजी नाट्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. रॉयलस्टोन या शासकीय निवास्थानी ही दोन्ही नेत्यांमध्ये भेट होत आहे.

दरम्यान, 'रोहिनी खडसे आणि पंकजा मुंडे या पडल्या नाहीत तर त्यांना पाडण्यात आलं आहे,' असा आरोप नुकताच एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांचा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता का, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. तर पक्ष नेतृत्व आम्हाला आगामी काळात काय जबाबदारी देतं ते पाहून निर्णय घेऊ, असं प्रकाश मेहता यांनी म्हटलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies