भाजपमध्ये मेगानाराजी, 12 आमदार फुटण्याची शक्यता

या चोरांच्या उलट्या बोंबा, भाजपचा पलटवार

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा एक आठवडा पूर्ण होत असताना डझनभर आमदारांनी; तसेच राज्यसभेच्या एका विद्यमान खासदाराने भाजपला 'धक्का' देण्याची तयारी चालवली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून 'मेगाभरती'अंतर्गत भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुमारे डझनभर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून करण्यात आला आहे.

दरम्यान, डझनभर आमदार फुटणार असल्याची चर्चा भाजपनं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. 'भाजपचा एकही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येच अस्वस्थता असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्या भीतीतून अशा अफवा पसरवल्या जात असून या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत,' असा पलटवार भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies