नॉर्थ ईस्ट रेल्वेमध्ये 10 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी 1104 पदावर मेगा भरती

परीक्षेविना मुलाखतीवर होऊ शकतं सिलेक्शन

मुंबई । नॉर्थ ईस्ट रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी 10 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी 1104 पदांसाठी जागा निघाल्या आहेत. RRB, Railway मध्ये 1104 पदांसाठी भरती होत आहे. विशेष म्हणजे परीक्षेविना मुलाखतीवर होऊ शकतं सिलेक्शन. या नोकरीसाठी सिलेक्शन होऊ शकतं. रेल्वे भरतीसाठी आजपासून अर्ज भरले जाणार आहेत.
पदांसाठी जागा
फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, कारपेंटर, मशीनिस्ट
पात्रता - या पदांकरीता अर्ज कऱण्यासाठी 10 पास असणं आवश्यक आहे.
- उमेदवाराजवळ आईटीआई सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

या पदांसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचं वय 15 वर्षापेक्षा जास्त असायला हवं. यासोबतच 25 डिसेंबर 2019 पर्यंत उमेदवाराचे वय 24 वर्षांपेक्षा जास्त असू नये. अर्ज भरण्यासाठी 100 रुपये शुल्क लागणार आहे. हा अर्ज तुम्ही ऑनलाईन भरू शकता.

ner.indianrailways.gov.in वर लॉगईन करा. त्यानंतर पदाची निवड करा. तुमचं नाव, आणि इतर माहिती भरून अर्ज जमा करा. त्यानंतर पैसे भरा. ऑनलाईन नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे तुम्ही पैसे भरू शकता. अधिक माहितीसाठी इंडियन रेल्वेच्या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेऊ शकता.AM News Developed by Kalavati Technologies