पंतप्रधान मोदींशी भेट हा अनोखा अनुभव, नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केल्या भावना

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला

नवी दिल्ली । नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट एक अनोखा अनुभव होता, अशा शब्दांत नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला.

ते म्हणाले, सर्वसाधारणपणे धोरणांबद्दल आपण ऐकतो. पण ते धोरण तयार करण्यामागे काय विचार होता, याबद्दल क्वचितच ऐकायला मिळते. नरेंद्र मोदींनी ते प्रशासनाकडे कशा पद्धतीने बघतात, लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडण्यामागे काय कारणे असतात, ही व्यवस्था नंतर काही मूठभर लोकांच्या हातात कशी सापडते, याबद्दल सविस्तर विवेचन केले. प्रशासनात आपण कशा पद्धतीने सुधारणा करीत आहोत. जेणे करून प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी अधिकाधिक उत्तरदायी होतील, याबद्दल त्यांनी माहिती दिली.



AM News Developed by Kalavati Technologies