उद्या होणार शिवसेना-कॉंग्रेस नेत्यांची बैठक, सत्तास्थापनेबाबत होणार चर्चा

ही बैठक कुठे होणार याबाबत अजुन संभ्रम आहे

मुंबई । राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकीची तारीखही निश्चित झाली आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतो का याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. यावर चर्चेसाठी उद्या शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतो का? यावर चर्चा होणार आहे. दरम्यान ही बैठक मुंबईत, महाराष्ट्रात होणार की दिल्लीत याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.AM News Developed by Kalavati Technologies