युपीमध्ये लॉकडाउनचा नवीन फॉर्मूला, प्रत्येक शनिवारी आणि रविवारी बाजारासह, कार्यालयेही राहणार बंद

कोरोनाला आळा घालण्यासाठी बाजार आणि कार्यालये आठवड्यातुन पाच दिवसच उघडणार

दिल्ली । कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी युपी सरकारने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उत्तर प्रदेशमध्ये विकेंड लॉकडाउन फॉर्मूला लागु करण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी दोन दिवस राज्यातील सर्वच ठिकाणी लॉकडाउन असेल यामध्ये बाजारपेठा आणि कार्यालय विशेषत: बंद राहणार आहे. कार्यालय आणि बाजारपेठा आठवड्यातुन फक्त पाच दिवसच उघडणार आहे. युपीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे त्याला आटोक्यात आणण्यासाठी हा उपक्रम राबविल्या जात आहे. शुक्रवारी रात्री 10 पासुन सोमवारी पहाटे 5 पर्यत असा लॉकडाउन असेल. अशी सुचना मुख्य सचिव राजेंद्र तिवारी तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies